न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०२४) :- कै श्री भाऊसाहेब तापकीर प्राथमिक प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत संस्थेचे सचिव श्री मल्हारीशेठ तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी वारकरी संप्रदायाचे बाळासाहेब सांगोळे, ज्येष्ठ संचालक राजाराम तापकीर, संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत तापकीर, विमलसन्स उद्योग समूहाचे उमेश शिंदे, डॉ राजीव कुंभार, सामाजिक कार्यकर्ते मधुकर देशमुख, मारुती पेंटेवार, शशिकांत अकलूजकर, निखिल घाटगे मान्यवर उपस्थित होते.
इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी संचलन करून ध्वजाला मानवंदना दिली. सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार व साहित्य कवायत केले. ढोल ताशाच्या तालावर अप्रतिम तलवार नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतावर नृत्य व कसरती सादर करून शहिदांच्या स्मृतीस अभिवादन केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या चित्तथरारक कसरतीने उपस्थितांची वाहवा मिळवली.विद्यार्थ्यांनी चंद्रयान गीतावर उत्तम सादरीकरण करून इस्त्रोला मानवंदना दिली.अथर्व पाटील,सार्थक हांडे,पूजा पाटील,वैष्णवी दहीभाते व आयुषमान गोसाई या विद्यार्थ्यांनी भाषणे केली.डहाके मॅडम देशभक्तीपर गीत गायन केले.
कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या प्र.मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री पवार यांच्या अधिपत्याखाली उल्का जगदाळे, संतोष पानसरे, इतर शिक्षक/शिक्षकेतर यांनी केले. रेश्मा स्वामी यांनी सूत्रसंचालन केले. तर पूनम कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी मोठ्या संस्थेने विद्यार्थी व पालक उपस्थित होते. खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.