न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०२४) :- पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने दिवाळीत आयोजित करण्यात आलेल्या किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ काळेवाडी येथे नुकताच संपन्न झाला. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.
देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत हा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. याप्रसंगी पिंपरी चिंचवड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सजी वर्की, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कौस्तुभ नवले, प्रदेश सोशल मीडिया समन्वयक वसीम शेख, जिल्हा प्रवक्ते विशाल कसबे, जिल्हा सरचिटणीस जिफिन जॉन्सन, विक्रांत सानप, युवक काँग्रेसचे पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप, चिंचवड विधानसभा अध्यक्ष रोहित शेळके, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, फिलिप जॉन्सन, हृषीकेश जाधव, मंगेश गायकवाड यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेच्या विजेत्यांना सन्मानपत्र आणि रोख रक्कम असे बक्षीस देण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या सार्थक कलापुरे (खराळवाडी) याला ५ हजार रुपये रोख व सन्मानपत्र देण्यात आले. द्वितीय क्रमांक विजेते फाल्गुनी सावंत (मोरे वस्ती) हिला ४ हजार रुपये रोख व सन्मानपत्र, तृतीय क्रमांक विजेते हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (निगडी) यांना ३ हजार रुपये रोख व सन्मानपत्र, चतुर्थ क्रमांक विजेता हर्ष कलापुरे (खराळवाडी) याला २ हजार रुपये रोख व सन्मानपत्र तसेच पाचवा क्रमांक पटकविणाऱ्या आदित्य नखाते (काळेवाडी) याला १ हजार रुपये रोख व सन्मानपत्र असे बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेला पिंपरी चिंचवड शहरातून सुमारे १०० हुन अधिक चिमुकल्यानी सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला होता.











