न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०२४) :- बाहेर देशाचा फिर्यादीसह त्यांच्या १९ मित्रांना व्हिजा मिळवुन देतो, असे आश्वासन आरोपीने फिर्यादीला दिले. फिर्यादीकडुन १९ पासपोर्ट कुरीयरद्वारे मागून घेतले. त्यातील बुनेई देशात जाण्यासाठी १० जणांचा बनावट व्हिजा बनवून त्यावर बनावट शिक्के व मोहोर उमटवून ते फिर्यादीच्या व्हाट्सअपवर पाठवले.
ते खरे असल्याचे भासवत फिर्यादीकडे पैशांची मागणी करून त्यांची फसवणुक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार १ ऑक्टोबर २०२३ पासून ते आजता गायत ब्लु ओशन मरीन कंपनी, भुमकर चौक, वाकड येथे घडला.
फिर्यादी मनिष स्वामी यांनी आरोपी blue ocean marine company या कंपनीच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. हिंजवडी पोलिसांनी ८९/२०२४ भा.द.वि. क ४२०,४६५, ४६८,४६९, ४७०,४७६, ३४ नुसार कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सपोनि गोमारे पुढील तपास करीत आहेत.













