- ‘आता ट्रेलर दाखवला आहे; नंतर पुर्ण पिच्चर दाखवेन’; व्यवसायिकाला धमकी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०२४) :- ‘अंडे का बादशहा, भुर्जी का शेहनशा’ नावाच्या अंडाभुर्जीच्या गाड्यावर फिर्यादी काम करत होते. त्यावेळी फिर्यादीच्या ओळखीचा मित्र आरोपी १ व इतर तीन अनोळखी इसम तिथे आले. जुन्या भांडणाचा राग मनात धरुन फिर्यादीला आरोपींनी दगडाने, कोयत्याने, लोखंडी पट्टीने, लाथांनी मारहाण करुन जखमी केले.
त्यावेळी आरोपी १ हा जाता जाता फिर्यादीला ‘तु लायकीत रहायचे, नाही तर आता ट्रेलर दाखवला आहे; यानंतर पुर्ण पिच्चर दाखवेन’, असे ओरडत गेला. त्यावेळी काळ्या रंगाची हुडी जींग घातलेल्या इसमाने हवेत कोयता फिरवत ‘लाल्या भाऊ सोबत पंगा नाही घ्यायचा नाही’, अशी धमकी दिली. ही घटना (दि. २६) रोजी रात्री ९.१५ वा. ओपन जिमच्या शेजारी, दत्तनगर चौपाटी, दिघी येथे घडली.
फिर्यादी गौरव बळीराम शेवाळे याने आरोपी १) शुभम संदिप सोनवणे, २) इतर अनोळखी तीन इसम यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. दिघी पोलिसांनी ४०/२०२४ भा.द.वि कलम ३२४, ३२३, ५०४, ३४ आर्म अॅक्ट ४,२५, क्रिमीनल लॉ अमेडमॅट ३, ७ महाराष्ट्र पोलीस अॅक्ट ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोहवा लोणकर पुढील तपास करीत आहेत.













