न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ फेब्रुवारी २०२४) :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बुधवारी (दि. ३१) बदल्या झाल्या. त्यात पिंपरी-चिंचवडचे पोलिस सहआयुक्त डॉ. संजय शिंदे आणि पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांचा समावेश आहे.
पोलिस सहआयुक्त डॉ. शिंदे यांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बदली झाली. पोलिस उपायुक्त डॉ. डोळे यांची नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या पोलिस अधीक्षकपदी बदली झाली.
नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीचे पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांची पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.













