- पुनावळेतील घटना; ठेकेदारावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ फेब्रुवारी २०२४) :- सुरक्षीततेच्या दृष्टीने कोणतेही सुरक्षा रक्षक उपकरणे हेल्मेट, बेल्ट, सुरक्षारक्षक जाळी साईटमधील कॉन्ट्रॅक्टरने लेबरला पुरविली नाही. निष्काळजीपणाने मयत रवीकुमार सुनिलकुमार निर्मलकर (वय १९ वर्षे) यास कामावर ठेवले.
साईटच्या पाचव्या मजल्यावर काम करत असताना मजूर खाली पडल्याने त्याच्या डोक्याच्या पाठीमागील भागास गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तो मयत झाला आहे. हा प्रकार (दि.२९/०१/२०२४) रोजी ९.३० च्या सुमारास के शाईन साईट, पाचव्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर पडून काम करत असताना पुनावळे येथे घडला.
फिर्यादी राजु हिरालाल साहु यांनी आरोपी धारया मोतीलाल नाईक याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. रावेत पोलिसांनी ३३/२०२४ भा.द.वि कलम ३०४ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि टार्फे पुढील तपास करीत आहेत.













