- हिंजवडी, देहुरोड, वाकड, तळेगाव, चिखली, हडपसर, इंदापुर दुचाकींची चोरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ फेब्रुवारी २०२४) :- चैनीसाठी मोटार सायकल चोरी करणाऱ्या आरोपीला हिंजवडी पोलीसांनी अटक केली असून त्याच्याकडुन ३,६०,००० रुपये किमतीच्या एकुण १२ दुचाकी जप्त केल्या आहेत.
तानाजी मधुकर आमले यांनी हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. (दि. २४/०१/२०२४) रोजी कोलते पाटील येथील गेटवर त्यांची दुचाकी लावली असता ती कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेली होती. त्यावरुन हिंजवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक करून आरोपी निष्पन्न केला. वाकड ब्रिज येथे पांढऱ्या रंगाच्या गाडीवर तो थांबलेला आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन पोलीसांनी सापळा लावुन आरोपीला ताब्यात घेतले. सुर्यकांत बळीराम आडे (वय-२५ वर्षे, धंदा- ड्रायव्हर, रा. पिंपळे सौदागर, मुळ गांव कोल्ही ता. वाशिम जि. वाशिम) असे अटक आरोपीचे नाव आहे.
त्याने चैनीसाठी हिंजवडी, देहुरोड, वाकड, तळेगाव दाभाडे, चिखली, हडपसर, इंदापुर भागातुन मोटार सायकल चोरी केल्याचे सांगुन त्या काढुन दिल्याने त्या पंचनाम्याने जप्त करुन त्याच्याकडुन चोरी केलेल्या एकुण १२ मोटार सायकल किमंत ३,६०,००० रु असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन एकुण ११ मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे पोलीस सह आयुक्त, वसंत परदेशी अप्पर पोलीस आयुक्त, बापु बांगर पोलीस उप आयुक्त परि. २, डॉ. विशाल हिरे सहा. पोलीस आयुक्त वाकड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, सोन्याबापु देशमुख पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बापुसाहेब धुमाळ, नरेश बलसाने, बाळकृष्ण शिंदे, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, कैलास केंगले, विक्रम कुदळ, अरूण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, मंगेश सराटे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडीत, यांनी केली आहे.













