- एकाच ठिकाणी मिळणार शासकीय दाखले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव दाभाडे (प्रतिनिधी) (दि. ०३ फेब्रुवारी २०२४) :- मावळ तालुक्यातील नागरिकांसाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून ‘महाराजस्व’ अभियानातंर्गत ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचा दुसरा टप्पा सोमवार (दि. ५ ते दि. १४) पर्यंत वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्समध्ये सकाळी ९ ते ६ या वेळेत राबविण्यात येणार आहे.
प्रत्येक गावास एक दिवस निश्चित करण्यात आला असुन त्या दिवशी त्या गावाशी संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत. एकाच ठिकाणी शासकीय दाखले, शेतकऱ्यांसाठीच्या योजना, महिला सक्षमीकरण योजना तसेच वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येणार आहे.
शासनाच्या योजनांचा उपक्रमांचा लाभ सामान्यांना तात्काळ मिळावा हा या अभियानाचा उद्देश असल्याची माहिती आमदार सुनील आण्णा शेळके यांनी दिली आहे.