न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव दाभाडे (प्रतिनिधी) (दि. ०३ फेब्रुवारी २०२४) :- महाराष्ट राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे कर्मचारी आणि शिक्षकांमार्फत सुरु असलेल्या मोबाईल आधारित सर्वेक्षणांतर्गत मराठा व खुल्या समाजासाठी सर्वेक्षण करण्यात आले.
दि. २३ जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंत तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील कुटुंबाचे १०० टक्के सर्वेक्षण पुर्ण झाले आहे, अशी माहिती तळेगावचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी दिली.
यासाठी प्रगणक म्हणुन १५८ जणांनी घरोघरी जावुन काम पाहिले. त्यामध्ये शासकीय यंत्रणा, नगर परिषद कर्मचारी व स्थानिक शिक्षकांनी योगदान दिले. या सर्वेक्षणात २० टक्के लोकांचा अल्प प्रतिसाद लाभला असुन, ३० टक्के नागरिकांची घरे बंद आढळली. तसेच ५० टक्के नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.













