- पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ फेब्रुवारी २०२४) :- आम आदमी पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष रशीद आत्तार, आपचे मा. युवा संघटन मंत्री राहुल शिंपले, सदस्य अनिल जाधव, अरबाज सय्यद, अवैध सय्यद, ऋषिकेश भोसले, प्रतीक अधिक, अवधूत गोडसे, विशाल शिंदे आदी पदाधिकाऱ्यांनी रमेश बागवे यांच्या उपस्थितीत व शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वात नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
आम आदमी पार्टीमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज असल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा विधानसभा, महानगरपालिका निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टी कशाप्रकारे लढत देते, हे पहावे लागेल.


















