- आगीचे कारण अद्याप अस्पष्ट; जखमींना हलविले रुग्णालयात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२४) :- आळंदी जवळील सोळू गावात आज गुरुवारी (दि. ८) रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास स्फोट होऊन आजूबाजूच्या घरांना आग लागली. घरातील सिलेंडरचा स्फोट झाला. त्यात आठ ते दहा लोक जखमी झाले तर, एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.
सर्व जखमींना नजीकच्या रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे अग्निशमन दल, पोलीस अधिकारी दाखल झाले त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
दरम्यान येथील स्पेसिपिक आलोय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये आग लागली. ही कंपनी अंदाजे चार वर्षा पासून बंद स्थितीत आहे. असे स्थानिकांकडून समजले. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सुरुवातीला विद्युत रोहित्राचा स्फोट होऊन आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. महावितरणच्या चाकण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता विजय गारगोटे व सहायक अभियंता संदीप कुऱ्हाडे यांनी तातडीने सोळू येथे वीजयंत्रणेची पाहणी केली. यामध्ये घटनास्थळी असलेल्या रोहित्राचा प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचा स्फोट झाल्याचे आढळून आले नाही. तसेच आग लागल्याचे देखील दिसून आले नाही. आग विझवल्यानंतरही हा रोहित्र सुस्थितीत असल्याचे आढळून आले. मात्र बाजूची भिंत पडल्याने रोहित्राचे वीजखांब वाकले आहेत.