न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. ०८ फेब्रुवारी २०२४) :- खेड तालुक्यातील खराबवाडी ग्रामपंचायत निवडणूकीची वॉर्ड रचना आणि आरक्षण गुरुवारी (दि. ८) रोजी जाहीर झाले आहे. चाकण एमआयडीसी अंतर्गत हे गाव येत असल्याने येथील ग्रामपंचायतीवर आपले राजकीय वर्चस्व रहावे, यासाठी इच्छुकांनी राजकीयदृष्ट्या ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
चाकण मंडळाधिकारी चेतन चासकर, तलाठी शाम वाल्हेकर व खराबवाडी ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी रमेश चौरे यांच्या उपस्थितीत ही वॉर्ड रचना आणि आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
खराबवाडी गावाची वॉर्ड निहाय रचना पुढील प्रमाणे…
खराबवाडी गावात एकूण ६ वॉर्ड आहेत. एक नंबर वॉर्डमध्ये अनुसूचित जातीसाठी १ जागा, सर्वसामान्य प्रवर्गासाठी १ जागा, सर्वसामान्य स्त्रीसाठी १ जागा आहे. वॉर्ड नंबर दोनमध्ये अनुसूचित जमाती १, अनुसूचित जाती महिला १, सर्वसाधारण १ जागा आहे. वॉर्ड नंबर तीनमध्ये अनुसूचित जाती महिला १ व सर्वसाधारण १ असे आरक्षण आहे. वॉर्ड नंबर चारमध्ये सर्वसाधारण १, सर्वसाधारण महिला २ तर वॉर्ड नंबर पाचमध्ये सर्वसाधारण १, सर्वसाधारण महिला २, वॉर्ड नंबर सहामध्ये सर्वसाधारण १, सर्वसाधारण महिलांसाठी २ जागा आहेत.