- भाजपचे अमित गोरखे यांच्या विशेष प्रयत्नातून श्रीराम दर्शनाचे नियोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२४) :- श्रीराम मंदिर रामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेनंतर संपूर्ण भारतभरातून भक्तांचा ओघ अयोध्याकडे सुरु आहे. पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे यांच्या प्रमुख संयोजनातून पिंपरी विधानसभा क्षेत्रातील तीनशे रामभक्त शनिवारी (दि. १०) रोजी भारत शासनाच्या स्पेशल रेल्वेने सायंकाळी आठ वाजता पुणे/लोणावळा येथून अयोध्येकडे रवाना झाले. त्यांची सर्व व्यवस्था या रेल्वेमध्ये करण्यात आली आहे.
अयोध्येत पोचल्यावर राहणे व श्रीराम दर्शन व्यवस्था तेथील शासनाच्या मदतीने करण्यात आलेली आहे. या रेल्वेमध्ये मावळ, चिंचवड, उरण या विधानसभा क्षेत्रामधील श्रीराम भक्त मोठ्या प्रमाणात असणार आहेत. १० ते १५ फेब्रूवारी पर्यंत हा प्रवास असणार आहे.
या विशेष सेवेसाठी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे यांचे सहकार्य लाभले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संदीप जाधव, सदाशिव खाडे, अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, तुषार हिंगे, केशव घोळवे, मनीषा शिंदे, गणेश लंगोटे, राजू बाबर, कैलास कुटे, शीतल शिंदे, सतीश नागरगोजे, शैलेश कलकर्णी आदी मान्यवरांनी यात्रेकरूना यावेळी शुभेच्छा दिल्या.











