- कुणी कोयता उगारतयं तर, कोणी पिस्तुलीच्या धाकाने लुटालुट करतयं…
- वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक भयभीत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२४) :- पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारी वाढली आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. शहर राहण्यायोग्य आहे का? असा सवाल जाणकार नागरिक व्यक्त करीत आहेत. गुन्हेगारी टोळ्या पिस्तुलीच्या धाकाने लुटालूट तर वाहनांची तोडफोड करीत आहेत. सदगुरुनगर, भोसरी येथे आरोपींच्या टोळीने पिस्टलच्या दशहतीने एकाला ठोकण्याची धमकी दिली. तर अजंठानगर, निगडी येथे आरोपींनी वाहनांची तोडफोड करून एकावर कोयता उगारला. याप्रकरणी भोसरी आणि निगडी पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून काहीना पोलिसांनी बोड्या ठोकल्या आहेत.
‘इथे राहायचे असेल तर, आम्हाला पैसे द्यायचे तरच इथे रहायचे’ अशी धमकी वस्तीत राहणाऱ्या आरोपींनी फिर्यादीला दिली. तसेच त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. आरोपी क्र १ याने त्याच्या कमरेला असलेला पिस्टल काढुन ‘जास्त शहानपणा केला तर इथेच ठोकतो’ अशी धमकी दिली. आरोपी क्र २ याने फिर्यादीच्या पॅन्टच्या खिशातील ५०० रूपये जबरदस्तीने काढुन घेतले. आरोपी क्रं १ याच्याजवळ असलेल्या पिस्टलच्या दशहतीने जमलेले लोक तेथुन पळुन गेले. त्यानंतर आरोपी क्रं २ याने ‘तुम्ही जर आमची पोलीसांत तक्रार दिली तर तुम्हांला बघुन घेईल’, अशी धमकी दिली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि ८) रोजी रात्री ११. ०० च्या सुमारास रानतारा कॉलनी, सदगुरुनगर, भोसरी येथे घडली. फिर्यादी सिराजुल मयलुददीन नदाफ यांनी आरोपी १) पिराप्पा उर्फ सचिन जहन्नाथ येरे, २) तेजस चंद्रकांत डोंगरे, ३) विजय चव्हाण, ४) निल्या साळवे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी ८०/२०२४, भा.द.वि. कलम ३९४, ५०४, ३४,शत्र अधि. ३ (२५), म.पो.का क ३७ (१) १३५ क्रि, लॉ – ३ व ७ नुसार गुन्हा दाखल करीत आरोपी क्रं १ व २ यांना अटक केली आहे. पोउपनि मोहारे पुढील तपास करीत आहेत.
कोयत्यासारखे हत्यार घेवून ते हवेत फिरवून शिवीगाळ केली. ‘कोणात दम आहे, खाली या, तुकडे करतो, आज एकाचा तरी मर्डर करीत असतो’ अशी धमकी देवून परिसरात दहशत पसरवली. सोसायटीच्या खाली पार्क केलेली फिर्यादी यांची रिक्षा व इतर ५ वाहनांची तोडफोड करुन आरोपी क्रं २ याने त्याच्या हातातील कोयता फिर्यादीस ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीचे दिशेने फेकून मारला, असे फिर्यादीत म्हटलं आहे. हा प्रकार (दि.०९) रोजी रात्री ८.३० च्या सुमारास तक्षशिला हौ. सोसायटीच्या समोर, अजंठानगर, निगडी येथे घडला. फिर्यादी बाबासाहेब वैज्यनाथ सरवदे यांनी आरोपी १) गुटल्या उर्फ अनुराग सतीश पाटोळे, २) विशाल सुरेश शिंदे, ३) प्रफुल्ल त्रंबक गायकवाड, ४) रोहीत दत्तात्रय गायकवाड यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. निगडी पोलिसांनी ४७/२०२४ भा. द. वि. कलम ३०८,५०४, ५०६ (२),४२७, क्रिमीनल लॉ अँमेंडमेट अॅक्ट कलम-३,७ भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), मुंबई पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७(१) (३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी क्रं १ ते ४ यांना अटक केली आहे. सपोनि आजगेकर पुढील तपास करीत आहे.











