न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२४) :- कंपनीतुन कामावरुन काढुन टाकल्याच्या कारणावरुन दोघांनी फिर्यादीला वेळोवेळी फोन केला. समक्ष भेटुन ‘आम्हास कामावर घ्या, नाहीतर कंपनी आम्हांस जेवढा पगार देत होती, तेवढा दरमहिना हप्ता द्या, नाहीतर तुम्हास तुमचे घरी येवुन हातपाय काढुन जिवे मारू, अशी धमकी दिली.
हा प्रकार गेल्या दोन महिण्यापूर्वी तारीख आठवत नाही तसेच (दि. ११) रोजी दुपारी दोनच्या दरम्यान जेसीबी कंपनी, नवलाख उंब्रे, कंपनीच्या गेटवर घडला. फिर्यादी संजय आबाजी शेलार यांनी आरोपी १) विजय शंकर दळवी, २) नागेश भरत आंबेकर यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी २८/२०२३ भादवि कलम ३८६,३८४ ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली आहे. पोउपनि जगदाळे पुढील तपास करीत आहेत.