न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२४) :- छत्रपती शिवरायांच्या ३९४ व्या जयंतीच्या निमित्ताने अवघ्या महाराष्ट्रात उत्सवाचं वातावरण आहे. किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवरायांच्या शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील आदी नेतेमंडळी उपस्थित होती. आपल्या लाडक्या राजाच्या जन्मसोहळ्यासाठी शिवप्रेमी मावळ्यांनी किल्ले शिवनेरी सजवला होता. यावेळी पोलीस खात्याकडून सलामीही देण्यात आली.