- चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. १८ फेब्रुवारी २०२४) :- पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारापासून ते रहाटणीतील छत्रपती शिवाजी महारांच्या पुतळ्यापर्यंत भव्य रॅलीत सहभाग घेतला. यावेळी शाळेचे संचालक संदीप काटे उपस्थित होते.
शाळेतील ५ वी, ६ वी आणि ८ वी च्या विद्यार्थ्यांनी नाट्यमय पोवाडा सादर केला. इ. १ ली ते ६ वी च्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर भाषण केले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान केली होती. त्यामुळे कार्यक्रमाची आणखी शोभा वाढली.
शिस्तबद्ध लष्कर व संघटीत प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भारतीय इतिहासात, छत्रपती शिवाजी महाराजांइतका आदर आणि प्रशंसा फार कमी व्यक्तींना मिळाली आहे. त्यांचे आयुष्य खूप मोठ्या संघर्षाने भरलेले होते. सध्याच्या पिढीला त्यांचे विचार लढाऊ वृत्ती आणि जीवन कसे जगावे? याची प्रेरणा देतात.
शिवजयंतीचे व भव्य रॅलीचे आयोजन शाळेच्या उपमुख्याध्यापिका सुविधा महाले मॅडम यांनी केले. मयूर काळे सर, अमर, सागर काटे आणि शिक्षकवर्गाने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.