न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२४) :- पवना धरण येथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रावेत बंधारा येथे कमी प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज गुरवार (दि. २२) संध्याकाळचा व उद्या शुक्रवारी (दि. २३) रोजीचा पाणीपुरवठा कमी दाबाने व विस्कळीत राहणार आहे.
नागरिकांनी मनपाकडील उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून मनपास सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.











