- संरक्षण विभागाच्या टापूत आग पोहोचणार तोच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२४) :- देहूगावातील काळोखे मळ्यातील विजेच्या शॉर्टसर्किटमुळे सुमारे १२ एकर ऊस जळून खाख झाला असून ९ शेतकऱ्यांचे सुमारे १६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याबरोबर काही आंब्याची व नारळाच्या झाडासंह कादा पिकाचे ही नुसकान झाले आहे.
ही घटना सोमवार दि. २६ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली असून ही आग संरक्षण विभागाच्या डेपोपासुन अवघ्या २०० ते ३०० मीटर अंतरावर लागली होती. ही आग विझविण्यात अपयश आले असते तर मोठा अनर्थ झाला असता. यावेळी संरक्षण विभागाच्या डीएडी डेपोच्या संरक्षक कुंपनाच्या आतील बाजुला दोन अगीचे बंब व लष्कराचे जवान सज्ज होते. परंतू सुदैवाने ही आग विझविण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळाला.
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार येथील शेतकरी रामदास तुकाराम काळोखे, सचिन बाळासाहेब काळोखे, अभिजित सुदाम काळोखे, महेश मधुकर काळोखे, बबन लक्ष्मण काळोखे, खंडू सखाराम काळोखे, गणेश तुकाराम काळोखे, बाजीराव गोविंद काळोखे, गोपाळ गेणूजी काळोखे या नऊ शेतकऱ्यांचे आगीमुळे नुकसान झाले आहे.













