न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. २६ फेब्रुवारी २०२४) :- तळेगाव दाभाडे रोटरी सिटी क्लबच्या वतीने सुदुंबरे येथील जि. प. प्राथमिक शाळेस तीन स्मार्ट एलईडी टीव्ही संच भेट म्हणून प्रदान करण्यात आले. रोटरी क्लब अध्यक्ष सुरेश शेंडे व संस्थापक विलास काळोखे यांच्या हस्ते मुख्याध्यापक नितीन जाधव व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन गाडे यांच्याकडे ते सुपूर्त करण्यात आले.
अध्यक्षस्थानी सरपंच मंगल गाडे होत्या. माजी विद्यार्थी व रोटरी क्लब अध्यक्ष सुरेश शेंडे, मनोजकुमार नायडू व कार्तिक राव यांच्याकडून टीव्ही संच भेट म्हणून देण्यात आले.
याप्रसंगी क्लबचे सचिव भगवान शिंदे, उपाध्यक्ष किरण ओसवाल, रो. प्रशांत ताये यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी उपसरपंच बापूसाहेब बोरकर, शालेय समिती उपाध्यक्षा माधुरी गाडे, बाळासाहेब गाडे, दत्तात्रेय गाडे, स्वप्नील गाडे, संभाजी गाडे, रोटरीचे माजी अध्यक्ष दीपक फल्ले आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत संतोष पवार यांनी केले. प्रतिक्षित कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. नितीन जाधव यांनी आभार मानले.













