न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२४) :- मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे-लोणावळा दरम्यान अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांसाठी रविवारी (दि .३) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही गाड्या रद्द राहणार असून, काही गाड्या विलंबाने धावणार आहेत. एमजीआर चेन्नई-लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस साडेतीन तास विलंबाने धावेल.
हा मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
पुणे, शिवाजीनगरहून लोणावळ्यासाठी सकाळी ९.५७ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील, पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी ११.१७ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील, शिवाजीनगरहून लोणावळ्यासाठी दुपारी १२.०५ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील, पुण्याहून लोणावळ्यासाठी दुपारी ३ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील, शिवाजीनगरहून तळेगावसाठी दुपारी ३.४७ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील, पुण्याहून लोणावळ्यासाठी सायंकाळी ४.२५ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील, शिवाजीनगरवरून लोणावळ्यासाठी सायंकाळी ५.२० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सकाळी १०.०५ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील, लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सकाळी ११.३० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील, लोणावळ्याहून पुण्यासाठी दुपारी २.५० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील, तळेगावहून पुण्यासाठी सायंकाळी ४.४० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील, लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सायंकाळी ५.३०वाजता सुटणारी लोकल रद्द राहील, लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सायंकाळी ६.०८ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील, लोणावळ्याहून पुण्यासाठी सायंकाळी ७ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.