- चाकण MIDC उद्योजक संघटनेचे संचालक दत्तात्रय दगडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. ०३ मार्च २०२४) :- चाकण MIDC उद्योजक संघटनेचे संचालक दत्तात्रेय दगडे यांचा वाढदिवस त्यांच्या ॲसेंट प्रिसिजन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत चाकण MIDC उद्योजक संघटनेच्या वतीने शेकडो उद्योजकांच्या उपस्थितीत विविध सामाजिक उपक्रम करुन साजरा करण्यात आला.
तीन वर्षापुर्वी चाकण MIDC उद्योजक संघटनेने परिसरातील रात्रीच्या चोऱ्या व दरोडे यांना रोखण्यासाठी खाजगी सिक्युरिटी कंपनीकडून 2 व्हीलर वरून नाईट पॅट्रोलिंग चालू केले होते. याचा खूप चांगला परिणाम झाला व चोऱ्या तसेच दरोडे याला कायमचा आळा बसला. रात्रीची थंडी तसेच पाऊस चालू असताना देखील नाईट पॅट्रोलिंग अव्याहतपणे चालुच होती. 1 मार्च 2024 रोजी चाकण MIDC उद्योजक संघटनेचे संचालक दत्तात्रेय दगडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नाईट पॅट्रोलिंग करीता सेंट्रल ह्युमन रिसोर्स सर्विसेस या खाजगी एजन्सीजच्या माध्यमातून 4 चाकी वाहनाचे लोकार्पण महाळुंगे पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर कल्याण घाडगे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान दत्तात्रय दगडे यांच्यावतीने किनारा वृद्धाश्रम, वडगाव मावळ येथे गरजूंना वस्तूंचे व किराणा मालाचे मोठ्या प्रमाणात दान देण्यात आले. याप्रसंगी चाकण MIDC उद्योजक संघटनेचे पदाधिकारी आणि इतर उद्योजक हे सहकुटुंब तसेच इतर मित्रपरिवारासह उपस्थित होते.
दत्तात्रय दगडे यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवरांनी त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. चाकण MIDC उद्योजक संघटनेचे सचिव श्री निवास माने यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. चाकण MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दत्तात्रेय दगडे यांनी सर्वांचे आभार मानले.













