- रोकड व ऐवज लांबवीत दमदाटी; हिंजवडी पोलिसांनी चौघांना घेतलं ताब्यात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ मार्च २०२४) :- दुकान बंद करुन कारमधुन जात असताना साईट देण्याच्या किरकोळ कारणावरुन कारमधुन बाहेर आलेल्या आरोपी चौघांनी फिर्यादीसोबत वाद घालुन त्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. लोखंडी रॉडने व पाणी पिण्याच्या स्टीलच्या बाटलीने मारहाण केली.
त्यांच्या पाठीत, डोक्यात, कानाच्या भोवती व डाव्या डोळ्याच्या भोवती मारुन त्यांना जखमी केले. त्यांच्याकडील ८०,००० रुपये कीमतीची सोन्याची चैन दोन तोळे वजनाची व २०,००० रु. रोख रक्कम असा एकुण १,००,००० रुपये कीमतीचा माल जबरदस्तीने आरोपी घेवुन गेले. तसेच जाताना फिर्यादीच्या कारवर दगड मारुन कारचे नुकसान केले. फिर्यादीला ‘गपचीप निघुन जा; नाहीतर तुला सोडणार नाही’, असा दम दिला असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि.०१) रोजी रात्री ११.०० च्या सुमारास बेंगलोर मुंबई हायवे रोडच्या कडेला, सर्वीस रोडच्या उताराला, साई पेट्रोल पंपासमोर, ताथवडे येथे घडला.
फिर्यादी कुणाल सुनील भुजबळ यांनी आरोपी १) अक्षय सूदाम सूतार, २) विजय अशोक जाधव, ३) दिपक सूनिल कड, ४) स्वप्नील लक्ष्मण खांडवे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी २३४/२०२४ भां.द.वि. कलम ३९४,४२७,५०४,५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक केली आहे. पोउपनि ताकतोडे घटनेचा पुढील तपास करीत आहेत.











