- युवा नेते पांडाभाऊ साने यांच्या जनसंपर्क कार्यालयात बाळांना दिले पोलिओचे दोन थेंब…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. ०३ मार्च २०२४) :- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत देशभरात सर्वत्र लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. आज रविवारी (दि. ०३) रोजी या मोहिमेत शून्य ते ५ वर्षे या वयोगटातील बालकांना पोलिओ डोस दिले जात आहेत.
भाजपचे युवा नेते पांडाभाऊ साने यांच्या पुढाकारातून त्यांच्या जनसंपर्क कार्यालायात चिखली परिसरातील मोरेवस्ती-म्हेत्रेवस्ती-ताम्हाणेवस्ती व चिखली परिसरात लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली आहे. पालकांच्या उपस्थितीत बाळाला पोलिओचे दोन थेंब पाजण्यात आले. यावेळी आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यासह आरोग्य पर्यवेक्षक उपस्थीत होते.
आजही भारत देश पोलिओ मुक्त आहे. मात्र जगातील काही देशांमध्ये पोलीओ अजूनही कायम आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. सर्व पात्र बालकांना ही लस देण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. आजपासून तीन दिवस ही मोहीम सुरू असेल. आज लसीकरण न झालेल्या बालकांना ४ ते ९ मार्च दरम्यान घरोघरी जाऊन पोलिओचे डोस पाजण्यात येतील. परिसरातील नागरिकांनी आपल्या बालकांना पोलिओचा डोस अवश्य द्यावा, असे आवाहन पांडाभाऊ साने यांनी केले आहे.











