न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ मार्च २०२४) :- पिंपरी महापालिका ते निगडीपर्यंत महामेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ६ मार्च रोजी सकाळी सव्वादहा वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन होणार असल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.











