- रस्त्यासाठी जमीन मालक, विकसकांनी पालिकेला दिला जागेचा आगाऊ ताबा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ मार्च २०२४) :- वाकड, पुनावळे व चिखली, तळवडे परिसरातील विकास आराखड्यातील रस्त्याची जागा ताब्यात घेण्यासाठी मंगळवारी (दि. ५) रोजी महापालीकेच्या वतीने शिबीर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी जमीन मालक, विकसक जागा ताब्यात देण्यासाठी उपस्थित होते. अनेकांनी नगररचना विभागाने तयार केलेल्या नकाशा पाहून आपली जागा रस्त्याच्या संपादनात येत असल्याची खात्री झाल्यानंतर कागदपत्रे प्रत्यक्ष सादर करून जागेचा आगाऊ ताबा दिला
यात १) मौजे वाकड ,ताथवडे, पुनावळे, रावेत,मामुर्डी व किवळे येथील मंजुर विकास योजनेमधील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगतच्या दोन्ही बाजूस १२ मी. सेवा रस्ता, २) चिखली येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय ते संतपीठकडे जाणारा १२मी/१८मी रुंद डी.पी. रस्ता, ३) चिखली येथील साने चौक ते चिखली गाव १२मी, २४मी व ३०मी रुंद रस्ता, ४)चिखली येथील देहू आळंदी ते सोनावणे वस्तीकडे जाणारा ३० मी रुंद डी.पी. रस्ता, ५) चिखली येथील चिखली चौक ते सोनावणे वस्तीकडे जाणारा २४ मी रुंद रस्ता, ६)तळवडे येथील त्रिवेणीनगर चौक ते तळवडे चौकापर्यंत २४ मी रूंद उर्वरित रस्ता, ७) तळवडे येथील तळवडे कॅनबे चौक ते निगडी स्पाईन रस्त्याला जोडणारा १८ मी डी.पी. रस्ता, ८) तळवडे येथील नदीच्या कडेने जाणारा १२.०० मी रस्ता व चिखली तळवडे शीवेवरील २४.०० मी. रस्ता या जागांचा समावेश आहे.
महानगरपालिकेच्या नगररचना विभाग व स्थापत्य विभागाने संयुक्तपणे “अ” व “ब” प्रपत्र जमीन मालकांना शिबिरामध्येच दिले. दोन्ही ठिकाणचे जागेचे मालकांनी उर्वरित क्षेत्र ही लवकरच महानगरपालिकेच्या ताब्यात देण्याची तयारी दर्शविली आहे. या शिबीरामध्ये काही कारणास्तव उपस्थित न राहता आलेमुळे “अ” व “ब” प्रपत्र न मिळाल्यास संबंधित जमिनमालकांनी महानगरपालिकेतील नगररचना व विकास विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, मुख्य कार्यालय इमारत,पिंपरी, पुणे-४११०१८ येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधलेस “अ” व “ब” प्रमाणपत्र देणेत येईल.
या दोन शिबिराचे आयोजन आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. त्यामध्ये उपसंचालक, नगररचना प्रसाद गायकवाड, सहाय्यक संचालक, नगररचना संदेश खडतरे, कार्यकारी अभियंता विजयकुमार काळे, उपअभियंता उमेश मोने, सुभाष काळे, अशोक कुटे, विजय भोसले, नरेश जाधव, कनिष्ठ अभियंता अक्षय कुंभार, वृशाली पाटील, संजय बंडगर, राजदीप तायडे, मीनल दोडल, अनिल इदे, अमित पवार, रुपेश भूराने, अमोल पाचंगणे,
रुपुकचंद देशमाने, सच्छितानंद महाजन, रीनल तिडके, अमृता झवेरी, संदीप वाडीले, इमरान कलाल, अमित शिंदे, दिनेश नेहरकर सर्व्हेअर नितीन जवळकर, मुकुंद क्षीरसागर, परशुराम बनपट्टे, घनश्याम गवळी, कुंडलीक मोहिते, संतोष कदम, हनुमंत टिळेकर आदींनी सहभाग घेतला.














