न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ मार्च २०२४) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो लि. कारखान्यावर काही दिवसांपूर्वी ईडीने धाड टाकून चौकशी केली होती. याबद्दल रोहित पवार यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी पाचारणही करण्यात आले होते. त्यानंतर आज ईडीने मोठी कारवाई केली आहे.
‘बारामती ॲग्रो लि.’ कंपनीची मालकी असलेल्या ‘कन्नड सहकारी कारखाना लि.’ या कारखान्याची १६१.३० एकर जमीन, प्लांट, यंत्र आणि इमारत इत्यादींवर जप्तीची कारवाई केली आहे. या संपत्तीची एकूण रक्कम ५०.२० कोटी असल्याचे ईडीने सांगितले आहे.
या कारवाईनंतर रोहित पवार यांनीही एक्स अकाऊंटवर पोस्ट टाकत याबाबत भूमिका व्यक्त केली आहे. तसेच भाजपामध्ये जायला हवं का? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.











