न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मार्च २०२४) :- भोसरी पोलीस स्टेशनच्या तपास पथकने सराईत चोरट्याला अटक करून १६ मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत. योगेश शिवाजी दाभाडे (वय २४ वर्ष, रा. वळसाने, ता. साकी जि. धुळे) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार मॉन्टी वाघ (वय २२ वर्षे रा. दहिवत ता. चाळीसगाव जि. जळगाव) या दोघांनी भोसरी, चाकण, म्हाळुंगे, खडकी, तळेगाव दाभाडे, लोणीकंद, सांगवी या परीसरातुन चोरी केलेल्या १६ मोटारसायकल काढून दिलेल्या असून त्या गुन्हयाच्या तपासकामी जप्त करण्यात आलेल्या आहेत.
आरोपी योगेश शिवाजी दाभाडे हा अट्टल मोटार सायकल चोरटा असुन त्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, नाशिक शहर आयुक्तालय, नाशिक ग्रामीण , जळगाव ग्रामीण, धुळे ग्रामीण येथे यापुर्वी मोटार सायकली चोरीचे एकुण १७ गुन्हे केले आहेत. आरोपी कडुन गुन्हयातील चोरी केलेल्या एकुण ३,८४,०००/- रुपये किं. च्या १६ मोटार सायकल हस्तगत करण्यात भोसरी तपास पथकाला यश आलेले आहे.
भोसरी पोलीस ठाणेकडील एकुण ०७ गुन्हे, म्हाळुंगे पोलीस ठाणेकडील एकुण ०२ गुन्हे, तळेगाव दाभाडे पोलीस ठाणेकडील ०१ गुन्हा, चाकण पोलीस ठाणेकडील ०१ गुन्हा, सांगवी पोलीस ठाणेकडील ०१ गुन्हा, खडकी पोलीस ठाणेकडील ०१ गुन्हा, लोणीकंद पोलीस ठाणेकडील ०१ गुन्हा असे एकुण १४ गुन्हे उघडकिस आले आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 स्वप्ना गोरे मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग विशाल हिरे, विश्वनाथ चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रूपाली बोबडे पोलीस निरीक्षक यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले, पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोरे, पोलीस हवलदार हेमंत खरात, पोना नवनाथ पोटे, पोना प्रकाश भोजने मपोना मुळे, पोलीस अंमलदार स्वामी नरवडे,सागर जाधव, आशिष गोपी, प्रभाकर खाडे, सचिन सातपुते,महादेव गारोळे, ज्ञानेश्वर साळवे यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.











