न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. २३ मार्च २०२४) :- देहूगावमधील साई चौक ते वडाचा माळ यादरम्यान असलेल्या बाह्यवळण पुलाजवळ एक मृतदेह आढळला आहे. म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी एक मृतदेह इंद्रायणी नदीमध्ये तरंगत असलेली माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानंतर, पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बोटिंगच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला आहे. मृतदेहाचा पंचनामा करून तो प्रथम चाकण प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविला.
त्यानंतर तेथून वायसीएम रुग्णालय येथे आणण्यात आला. संबंधित तरुणीचे वय अंदाजे २२ आहे. या घटनेचा अधिक तपास म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस करीत आहेत.











