न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२४) :- भाजपाने देशपातळीवर पाच याद्या जाहीर केल्या आहेत. त्यातली दुसरी यादी आणि पाचवी यादी यामध्ये महाराष्ट्रातले २३ उमेदवार जाहीर झाले आहेत. पूनम महाजन यांची जागा वगळता भाजपाने २३ उमेदवारांना लोकसभेचं तिकिट दिलं आहे. यामध्ये पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांनाही स्थान देण्यात आलं आहे. तर पाच विद्यमान खासदारांचा पत्ता भाजपाने कापला आहे.
भाजपाने आत्तापर्यंत जी २३ नावं जाहीर केली आहेत त्यानुसार पाच विद्यमान खासदारांची तिकिटं कापण्यात आली आहे. उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, मुंबई उत्तर पूर्वचे खासदार मनोज कोटक, जळगवाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना भाजपाने तिकिट दिलेलं नाही. तर सोलापुरात जयसिद्धेश्वर स्वामी हे भाजपाचे खासदार आहेत. त्यांच्याऐवजी राम सातपुतेंना तिकिट देण्यात आलं आहे.
आत्तापर्यंत भाजपाचे जाहीर झालेले २३ उमेदवार कोण?
१) चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
२) रावेर – रक्षा खडसे
३) जालना- रावसाहेब दानवे
४) बीड – पंकजा मुंडे
५) पुणे- मुरलीधर मोहोळ
६) सांगली – संजयकाका पाटील
७) माढा- रणजीत निंबाळकर
८) धुळे – सुभाष भामरे
९) उत्तर मुंबई- पियुष गोयल
१०) उत्तर पूर्व मुंबई- मिहीर कोटेचा
११) नांदेड- प्रतापराव चिखलीकर
१२) अहमदनगर- सुजय विखे पाटील
१३) लातूर- सुधाकर श्रृंगारे
१४) जळगाव- स्मिता वाघ
१५) दिंडोरी- भारती पवार
१६) भिवंडी- कपिल पाटील
१७) वर्धा – रामदास तडस
१८) नागपूर- नितीन गडकरी<br>१९) अकोला- अनुप धोत्रे
२०) नंदुरबार- डॉ. हिना गावित
२१) सोलापूर – राम सातपुते
२२) भंडारा गोंदिया – सुनील मेंढे
23) गडचिरोली चिमूर – अशोक नेते