- अपेक्षेप्रमाणे मावळमधून श्रीरंग बारणे यांना पुन्हा उमेदवारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. मार्च २०२४) :- शिवसेना शिंदे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. एकूण नऊ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. अपेक्षेप्रमाणे मावळमधून श्रीरंग बारणे यांना पुन्हा पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे.
मात्र या पहिल्या यादीत कल्याण लोकसभेचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे आणि यवतमाळ-वाशिम लोकसभेसाठी कुणाचेही नाव जाहीर केलेले नाही, त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पहिल्या यादीत राहुल शेवाळे – मुंबई दक्षिण मध्य, संजय मंडलीक – कोल्हापूर, सदाशिव लोखंडे – शिर्डी (अनुसूचित जाती), प्रतापराव जाधव – बुलढाणा,
हेमंत पाटील – हिंगोली, श्रीरंग बारणे – मावळ, राजू पारवे – रामटेक (अनुसूचित जाती), धैर्यशिल माने – हातकणंगले यांना संधी देण्यात आली आहे.