न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च २०२४) :- आप-आपसात संगनमत करीत फिर्यादी व आरोपी क्रमांक १ यांच्या संयुक्त नावावर असलेल्या फ्लॅटच्या विक्रीसाठी आरोपींनी बनावट सह्यांच्या आधारे कागदपत्रे बनवली. फ्लॅट इतरांना विकला. फिर्यादीची रु २२.५० लाखांची आरोपींनी आर्थिक फसवणुक केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
फसवणुकीचा हा प्रकार (दि.०२/०१/२०१५ ते २६/०३/२०२४) बिजल अपार्टमेट, फ्लॅट क्र १, पिंपळे गुरव येथे घडला. महिला फिर्यादी यांनी आरोपी १) राजेंद्र दयाप्रसाद गायकवाड (रा. पिंपळे गुरव), २) सुलक्षण राजेंद्र गायकवाड, ३) लक्ष्मण बळीराम जाधव (रा. पिंपळे गुरव), ४) सदाशिव अच्युतराव परभणे (रा. कोकणेनगर काळेवाडी) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
सांगवी पोलिसांनी ११८/२०२४ भा.दं.वि कलम ४०६,४२०, ४६७,४६८, ४७१,३४ प्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि पाटील करीत आहेत.