न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. मार्च २०२४) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपायुक्त अजय चारठाणकर आणि मिनीनाथ दंडवते यांची बदली झाली आहे. राज्य शासनाने मुख्याधिकारी असलेले पंकज पाटील आणि तानाजी नरळे यांची सहायक आयुक्त म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रतिनियुक्तीवर नियुक्ती केली आहे.
उपायुक्त चारठाणकर यांना सोलापूर महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर, उपायुक्त दंडवते यांची परभणी महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. राज्य शासनाचे अवर सचिव अ. का. लक्कस यांनी या नियुक्तीचे आदेश काढले आहेत.