न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. मार्च २०२४) :- शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (दि. १७) रोजी १७ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यात मावळ मधून माजी महापौर संजोग वाघेरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. उमेदवारी जाहिर होताच वाघेरे गुरुवारी (दि २८) मुंबईत मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांच्या भेटीला गेले होते.
वाघेरे ठाकरे यांचे आभार मानन्यासाठी व सदिच्छा भेटीला मातोश्रीवर गेले होते. निवडून याल व हा गड पुन्हा आपणाला राखायचाय अशा पध्दतीने काम व प्रचार करा, असे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगितल्याची माहिती वाघेरे यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख होती. २०१४ पासून लोकसभेसाठी ते इच्छुक होते.
संजोग वाघेरे म्हणाले, पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली त्याबद्दल मी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे, नेते संजय राऊत, सचिन अहिर यांचा आभारी आहे. मावळची परंपरा राखण्यासाठी शिवसेनेचा गड राखून विजय मिळवेल असा मला विश्वास आहे.