- कार, बस, टेम्पोवर हातोडी, दगड मारून वाहनांचे केले नुकसान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. मार्च २०२४) :- तिघांनी हातात हातोडी, दगड, घेवून जबरी चोरी करण्याचे इरादयाने हातोडीने, दगडाने फिर्यादी यांची कारची काच फोडली. फिर्यादी यांना चापट मारून, ढकलुन देवून त्यांच्या कारच्या डॅशबोर्डच्या कप्यातील ११०० रूपये चोरले.
दहशत निर्माण करण्यासाठी परिसरातील आणखी कार, अल्ट्रा बस, टेम्पो, मारूती कारवर हातोडी, दगड, मारून त्यांची काच फोडत, पत्रा चेपवून गाडयांचे नुकसान केले. शिवीगाळी करून, हातात हातोडी, दगड घेवून जिवे ठार मारण्याची धमकी देवून, परीसरात दहशत निर्माण केली, असं फिर्यादीत नमूद आहे. ही घटना (दि. २७) रोजी रात्री ००.३० ते रात्री ०२.०० च्या सुमारास पाटोळे वस्ती, कोतवालवाडी, चऱ्होली येथे घडली.
फिर्यादी मारूती दत्तात्रय राउत यांनी आरोपी १) ओंकार युवराज लांडे (वय २१ वर्षे, रा. कोतावालवाडी), २) सुरज अंकुश पाटोळे (वय २२ वर्षे, रा. कोतावालवाडी), ३) बाबु शहा (वय २३ वर्ष रा. कोतवालवाडी) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
दिघी पोलिसांनी १४०/२०२४ भादवी कलम ३९४, ४२७, ३२३, ५०४, ५०६(२).३४, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५, क्रिमीनल लॉ अमेंडमेंड अॅक्ट कलम ७७ नुसार गुन्हा दाखल करीत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोउपनि कटपाळे तपास करीत आहेत.