न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ एप्रिल २०२४) :- पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून एप्रिल महिन्यात पक्क्या वाहन अनुज्ञप्ती (परवाना) साठी शिबिर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत मंचर येथे ८ व १० एप्रिल, जुन्नर येथे १५ व १६ एप्रिल, वडगाव मावळ येथे २२ व २३ एप्रिल तर लोणावळा येथे २९ व ३० एप्रिल या दिवशी पक्क्या अनुज्ञप्ती शिबिर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पक्क्या अनुज्ञप्तीचा कोटा २८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता उपलब्ध झाला आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे.