न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ एप्रिल २०२४) :- चोरीच्या दुचाकीचा शोध घेत असताना देहुरोड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला मोटार सायकल घेवुन एकजण शिवाजी विद्यालयाजवळ, देहूरोड येथे थांबला आहे, अशी माहिती मिळाली. त्यांनी रविंद्र सुरेश सातोळे (वय १९ वर्षे, रा. पाण्याच्या टाकीजवळ, गांधीनगर, देहूरोड) याला ताब्यात घेतले.
रविंद्र याला अटक करून त्याची पोलीस कोठडी रिमांड मिळुन त्याचेकडे अधिक तपास केला. त्याने देहूरोड पो.स्टे.गुरनं. १६६/२०२४ भादंवि कलम ३७९, देहूरोड पो.स्टे. गु.रजि.नं. १७६/२०२४ भादंवि कलम व पिंपरी पो.स्टे. १३७/२०२४ भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडुन गुन्ह्यातील अद्यापपर्यंत एकुण १,६५,००० रुपये किंमतीच्या एकुण ०४ मोटार सायकली हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.
देहूरोड पोलीस स्टेशनचे ०३ व वाकड पोलीस स्टेशनचा ०१ असे एकुण ०४ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. देहूरोड पोलीस अधिक तपास करीत आहे.