न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ एप्रिल २०२४) :- मोशी येथील गुणवंत मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी पिंपरी चिंचवड शहरात खासगी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या इमारत मालकांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वसतिगृहाची कमाल शंभर विद्यार्थ्यांची क्षमता आहे. या इमारतीत सर्व सोयी सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. इच्छुकांनी अधीक्षक गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह, स्पाईन रोड, मोशी, पिंपरी-चिंचवड यांच्या कार्यालयात संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी अधीक्षक नरेश मकवाना भ्रमणध्वनी क्रमांक 9325054358 किंवा ई-मेल ॲड्रेस [email protected] वर संपर्क साधण्याचे आवाहन गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.