- शिवसेना सर्वाधिक जागा लढविणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ एप्रिल २०२४) :- महाविकास आघाडीनं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या तीन पक्षांमध्ये जागावाटप नेमकं कसं ठरलंय, याची घोषणा केली. यावेळी संजय राऊतांनी जागावाटपाचा फॉर्म्युला सांगितला. त्यानुसार शिवसेना सर्वाधिक २१ जागा, काँग्रेस १७ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट १० जागा लढवणार आहे.
मुंबईतल्या शिवालयमध्ये महाविकास आघाडीची आज संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यात शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, जयंत पाटील, संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.
यावेळी संजय राऊत यांनी कोणत्या पक्षाला कोणत्या जागा मिळाल्या आहेत, याचीही यादी जाहीर केली. त्यानुसार काँग्रेसला नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर-मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक आणि उत्तर मुंबई हे मतदारसंघ मिळाले आहेत.
दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशीव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य या जागा मिळाल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाट्याला बीड, बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण आणि बीड या जागा आल्या आहेत.
सर्व सहमतीने झालेल्या निर्णयाचं वाचन करण्यात आलेलं आहे. ४८ पैकी एकाही जागेबाबत मतभेद नाही. सर्वांमध्ये एकवाक्यता आहे”, अशी प्रतिक्रिया यावेळी शरद पवार यांनी दिली.