- पुण्यात चाललंय काय?; नागरिकांच्या जीवाशी खेळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० एप्रिल २०२४) :- खाण्याच्या बर्फात मेलेला उंदीर आढळून आला आहे. ही घटना जुन्नर तालुक्यातील वेल्हे परिसरात घडली आहे. याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
सध्या उष्णतेचा पारा वाढल्याने शीतपेयांच्या दुकानांमध्ये लोकांची गर्दी दिसत आहे. ज्युस, उसाचा रस यासह अन्य शीतपेयांमध्ये बर्फ टाकला जातो. आता अशाच एका बर्फाच्या लादीत मेलेला उंदीर आढळला आहे. या सर्व घटनेमुळे नागरिकांनी बाहेर खाताना तसेच शीतपेय किंवा इतर पेय पिताना काळजी घेणे गरजेचे आहे.
कालच एका धक्कादायक घटनेत एका प्रतिष्ठीत ऑटोमोबाईल कंपनीला पुरवलेल्या समोश्यात कंडोम, गुटखा आणि खडे आढळून आले ही घटना ताजी असतानाच आचा बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.











