न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० एप्रिल २०२४) :- निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अग्नीशस्त्राचा वापर होवुन गुन्हे घडण्याची शक्यता आहे. अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगाराविरुध्द कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
दरम्यान खाजगी वाहनाने भोसरी परिसरात पोलीस रेकार्डवरील आरोपीचा शोध घेत होते. त्यावेळी पोलिसांना खुन, मारामारी, आर्म अॅक्ट असे गंभीर गुन्हे दाखल असलेला आरोपी अमोल फिलीप साळवे (वय-३० वर्षे, रा. गव्हाणे पेट्रोलपंपाच्या पाठीमागे, भोसरी) हा भोसरी येथे पिस्टल सदृश्य हत्यार घेवुन फिरत आहे, अशी खात्रीशीर माहीती मिळाली. त्याप्रमाणे सापळा रचुन त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडुन एकुण ५७,००० रूपये अंदाजे किमतीचा एक पिस्टल दोन मॅक्झीनसह व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे.
त्याबाबत भोसरी पोलीस स्टेशन गु र नं २४७/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.