- असा आहे पर्यायी मार्ग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ एप्रिल २०२४) :- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणाहून मिरवणुका काढण्यात येतात. या मिरवणुकांव्दारे अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिपरी व दापोडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे येऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करत असतात. तसेच हिंजवडी येथे मिरवणुक होत असते.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय (अनुयायी) दर्शनाकरीता येत असल्याने जयंती उत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी या ठिकाणच्या वाहतुकीत बदल करणे आवश्यक आहे. (दि. १४) रोजी दुपारी १२.०० पासुन मिरवणुक, कार्यक्रम संपेपर्यंत अथवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून) पीएमपीएमएल व एमएसआरटीसीच्या बसेस तसेच सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीसाठी पिंपरी, भोसरी, हिंजवडी, सांगवी वाहतुक विभागाअंतर्गत प्रवेश बंद करण्यात येत आहे. नागरीकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
असा आहे वाहतुकीत बदल…
महावीर चौक चिंचवडकडुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरीकडे सर्व्हिस रोडने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग – डी मार्ट इन ग्रेड सेपरेटर मार्गे इच्छित स्थळी जाईल.
नाशिक फाटयाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिपरीकडे सर्व्हिस रोडने येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग – डेअरी फार्म ग्रेड सेपरेटर इन व एच पी पंप खराळवाडी रोड सेपरेटर इन मार्गे जाईल.
स्व. इंदिरा गांधी पुल ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी कडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रदेश बंद.
पर्यायी मार्ग – मोरवाडी चौकमार्गे इच्छितस्थळी जाईल
नेहरुनगर चौकाकडुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरीकडे सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग – एच ए कॉर्नर बस स्टॉप येथून मासुळकर कॉलनी मार्गे इच्छितस्थळी जाईल.
जय मल्हार खानावळ सम्राट चौक पासुन मोरवाडी चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.
सायन्स पार्क कडून मोरवाडी चौकाकडे येणारा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – अॅटो क्लस्टर कडुन येणारी वाहतूक मदर टेरेसा ब्रिज मार्गे इच्छितस्थळी जाईल.
क्रोमा शोरुम कडुन गोकुळ हॉटेलकडे जाणारा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांकरीता प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पिंपरी चौकाकडून पिंपरी पुलाकडे जाणारी वाहतुक गोकुळ हॉटेल येथे आवश्यकतेनुसार प्रवेश बंद करण्यात येत आहे.
अनुयायांचे वाहनांकरीता संत तुकाराम नगर जवळील एच.ए कंपनीचे पार्किंगमध्ये पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे.
हरिष ब्रिज ते फुगेवाडी चौक सर्व्हिस रोडने जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद पर्यायी मार्ग – हॅरिष ब्रीजने ग्रेडसेपरेटर मार्गे इच्छितस्थळी जाईल.
बोपोडी संविधान चौकाकडून दापोडी छ. शिवाजी महाराज पुतळा येथे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग – हॅरिष ब्रिज दापोडी मार्गे इच्छित स्थळी जातील.
शितळादेवी चौकाकडून दापोडी गावाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी.
पर्यायी मार्ग – शितळादेवी चौकाकडून सांगवी मार्गे इच्छित स्थळी जातील.
जुनी सांगवी पीएमपीएमएल शेवटचा बस स्टॉप नदीपुलावरून दापोडीकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – माकन चौक किंवा ममतानगर चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.
कस्तुरी चौक ते श्री शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना रस्ता बंद करणे.
पर्यायी मार्ग – कस्तुरी चौक येथून उजवीकडे वळुन विनोदे वस्ती मार्गे डावीकडे वळुन इंडियन ऑईल चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
मेझा-९ चौकाकडून हिंजवडी गावठाणकडे जाणारी वाहतूक ही श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सरळ पुढे जावुन इंडियन ऑईल चौक, कस्तुरीचौक, विनोदे वस्ती मार्गे इच्छित स्थळी जातील.
जांभुळकर जीम चौकाकडुन हिंजवडी गावठाणकडे जाणारी वाहतूक ही जांभुळकर जीम चौकातच यु टर्न घेवून परत इंडियन ऑईल चौक, कस्तुरी चौक, विनोदे वस्ती चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
मेझा-९ चौकाकडुन श्री शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या दोन लेन पैकी डावी लेन बंद करून सर्व वाहतूक ही उजव्या बाजुच्या लेनने सुरू राहील.