न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२४) :- मिंडेवाडी गावतील टीव्हीएस कंपनीतील डॉक नं १७ मध्ये लावलेल्या टाटा कंपनीच्या ट्रकमध्ये (आरएमटीए-बीआर आयएनएसइआरटी सीपवीसी एफआयटीटीआयएनजी त्याचा अॅटमको ११८१९२५११६६०५) एकुण १०,४२,७२० रु किंमतीचे फिनोलेक्स कंपनीचे ४९ बॉक्स चोरून वाहनात भरले.
आरोपी ने ट्रक हा पार्किंगमध्ये लावुन त्यानंतर त्यावरील चालक संतोष साळवी याला फोन करुन बाहेर आणुन देण्यास सांगितला. नंतर हा ट्रक कंपनीच्या गेटमधुन बाहेर घेवून जात असताना सिक्युरीटी गार्डने आडवला. मालाबाबत विचारले असता काहीएक माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा कंपनीचा सीसीटीव्ही पाहुन तो माल आरोपीने ट्रकमध्ये चोरी करून तो घेवून जाण्याचा प्रयत्न केला असल्याचे समजले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १४) रोजी ००.१८ वा ते ००.२४ च्या सुमारास मिंडेवाडीतील टी व्ही एस कंपनीतील डॉक नं १७ मध्ये घडला. फिर्यादी कमलेश अनिलराव पाटील यांनी आरोपी अमोल भालेराव (रा. मिंडेवाडी ता मावळ जि पुणे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी ९२/२०२४भा द वि कलम ३८०,५११ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सपोनि मस्के तपास करीत आहेत.