न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२४) :-पुणे जिल्ह्यातुन दोन वर्षाकरीता तडीपार केलेल्या तरुणाने कोणतीही कायदेशीर पुर्व परवानगी न घेता तडीपार आदेशाचा भंग केला.
त्याने हातामध्ये लोखंडी कोयता घेवून बेकायदेशीररित्या हवेमध्ये फिरवत “मी आळंदी मधील भाई आहे” असे म्हणून लोकवस्तीमध्ये दहशत पसरविली. त्यामुळे येथील नागरीकांनी दुकाणे बंद केली.
ही घटना (दि. १५) रोजी सायंकाळी ६.०० वा. केळगाव ता. खेड जि.पुणे येथील हनुमानवाडी रोडवर घडली. विनोद संभाजी भिसे (वय २८ वर्षे, रा. हनुमानवाडी, केळगाव ता. खेड जि. पुणे) याच्या विरोधात आळंदी ११६/२०२४ म.पो. कायदा कलम १४२ भा.ह.का. कलम ४,२५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५, क्रिमीनल लॉ अमेडमेड अॅक्ट कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करीत त्याला जेरबंद करण्यात आले आहे. पोहवा वहिल पुढील तपास करीत आहेत.