न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२४) :- पिंपरी-चिंचवडकर शहरात मंगळवारी (दि. १६) रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. सायंकाळी सहाच्या सुमारास भोसरी, कासारवाडी, फुगेवाडी, वल्लभनगरसह आदी भागात पावसाने हजेरी लावली. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला.
शहरात २४ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. रस्त्यावर झाड उन्मळून पडल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. अग्निशमन विभागाकडून रात्री उशिरापर्यंत रस्त्यावरील झाडे हटविण्याचे काम सुरू होते.
एक ठिकाणी आग, एका ठिकाणी ऑईल गळती झाली. अग्निशमन पथके शहरात विविध ठिकाणी कार्यरत असल्याचे अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांनी सांगितले.