न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०१९) :- मावळ व शिरूर लोकसभा मतदार संघात आज सोमवार (दि. २९) रोजी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी आप-आपल्या मतदारसंघात जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
यात पिंपरी चिंचवड व मावळ परिसरातील लोकप्रतिनिधी, महापौर, आमदार, खासदार, नगरसेवक, विविध खात्याचे पदाधिकारी व सामजिक कार्यकर्ते तसेच वाल्हेकरवाडी परिसरातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती यांनीही सहकुटुंब आप-आपल्या मतदारसंघात जाऊन, मतदानाचे पवित्र दान केले. तसेच शहरातील नागरिकांना मतदानासाठी बाहेर पडून, मतदान करण्याचे आवाहनही केले.
यावेळी त्यांच्या मतदान केंद्रात जाऊन, आमच्या प्रतिनिधीने मतदान केल्यानंतरचे त्यांचे काही निवडक छायाचित्रे काढली आहेत. ती पुढीलप्रमाणे :-

























