न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. २९ एप्रिल २०१९) :- चिखली येथील ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने आयोजित बाल मेळाव्यात बालगोपाळांनी मनमुराद आनंद.लुटला. यावेळी ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष डॉ. ललित धोका, संचालिका डॉ स्वप्नाली धोका, कलाकार रितू वत्सा, मिसेस महाराष्ट्र किताब विजेत्या योगिता दरबस्तेवार, मिस इंडिया इंटरनॅशनल किताब विजेती तनिष्का वावानी, स्वाती सराफ, मुख्याध्यापिका काजल छतीजा आदी उपस्थित होते.
या बाल मेळाव्यात मुलांनी खाद्यपदार्थावर ताव मारत, विविध खेळणीचा आनंद घेतला. कार्टून कॅरेक्टर शक्तिशाली राजू, हॅम्ली, हत्ती , भालू यांना भेटून आनंद व्यक्त केला. यावेळी मुले व पालक कार्टून कॅरेक्टर मायटी राजू, रोमांचक गेम्स, वाद्य वादन स्पर्धा, रोबोट,वाद्य वादन, यंत्रांवरील संगीत, ड्रम, सर्कल नाट्य कथा सांगणे, हस्तकला, नृत्य, टॅटू बनविणे आदी गोष्टी अनुभवल्या.

कुंभारकाम करनारे शिंदे बाबा यांनी मातीचे भांडे तयार करून दाखवले, तर कार्टून चित्रकार मुकिम तांबोळी यांनी मुलांचे स्केच काढून दिले. यावेळी माय लेकिंसाठी घेतलेल्या ऱॅंप वॉल्क स्पर्धेत अणवी व प्रीती फटांगरे यांनी प्रथम, समर्थ-सारिका द्वितीय, तर अनवी-अरवी-दिपाली यांनी तृतीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले.
चित्रकला स्पर्धेत वर्निका बीदारी, रितेश जांगडा, लावण्य व त्रिशा यांच्या चित्रास बक्षिसे देण्यात आले. सायंस ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक विजेत्या आदित्य शिंपी या विद्यार्थ्याचा यावेळी विशेष सन्मान केला. यावेळी सहभागी झालेल्या सर्व मुलाना इमॅजीकाचे मोफत कुपन देण्यात आले.
सूत्रसंचालन तरान्नुम शर्मा यांनी, तर आभार शीतल भट् यांनी मानले.











