न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०१९) :- ३३ मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मातब्बर उमेदवारांचे भविष्य आज मतपेटीत बंदिस्त होणार आहे. आज सकाळपासूनच मतदारांचा मतदानाबाबतचा कौल थोडासा निराशाजनकच जाणवत होता. मावळ व पिंपरी चिंचवड शहरातील विविध मतदान केंद्रावर मतदानाची सुरुवात थोडीशी संथगतीनेच सुरु होती.

सोमवार (दि. २९) रोजी सकाळी ७ वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. मावळ लोकसभा मतदारसंघात सुमारे ६ विधानसभा मतदारसंघ येतात. या विविध केंद्रावर सकाळी ७.०० ते दुपारी ३ वाजेपर्यंतच्या झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत सुधारणा थोडीशी झाली आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत अधिकृत मतदानाची टक्केवारी हाती आली, तेव्हा चित्र थोडेसे आशावादी जाणवत होते. आतापर्यंत मावळमधील कर्जत मतदारसंघात सर्वाधिक मतदान तर पिंपरी विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले आहे.

मतदानाची सविस्तर टक्केवारी खालीलप्रमाणे :-
१८८ पनवेल ४०.९० टक्के
१८९ कर्जत ४४.६० टक्के
१९० उरण ४२.५२ टक्के
२०४ मावळ ४१.७३ टक्के
२०५ – चिंचवड ४१.३४ टक्के
२०६ पिंपरी ३७. ८१ टक्के
एकूण ४१.३ टक्के


















