न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०२४) :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले यांना अटक करण्यात आली आहे. बॅलेट युनिट उलटा लावल्याचा जाब विचारल्याने खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप भोसले यांनी केला आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून श्रीरंग बारणे तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून संजोग वाघेरे रिंगणात आहेत. सकाळपासून मावळमध्ये मतदान सुरु होते.
दरम्यान ठाकरे गटाचे शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले हे थेरगाव येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले होते. बॅलेट युनिट उलटटे लावल्याचे दिसल्याने भोसले यांनी मोबाइलमध्ये चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना चित्रीकरण करण्यापासून अडविले. त्यानंतर भोसले यांनी मशीन हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार देत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी भोसले यांना तत्काळ अटक केली. न्यायालयात हजर करण्यात आले आहे.












