न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रावेत (दि. ३० एप्रिल २०१९) :- चार जणांनी दुचाकीवरून येऊन एका कारचालक तरुणाला लोखंडी कोयता व लाकडी दांडक्याने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (दि. २८) रात्री साडेदहाच्या सुमारास भोंडवे कॉर्नर रावेत येथे घडली.
दिनकर भास्कर शेट्टी (वय २९, रा. रावेत) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिनकर हे त्यांच्या कार मधून रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जात होते. भोंडवे कॉर्नर रावेत येथे आले असता अज्ञात चार जण दुचाकीवरून आले. त्यांनी दिनकर यांच्या कारला दुचाकी आडवी लावली. दिनकर यांना कार मधून बाहेर ओढून त्यांना लोखंडी कोयता व लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये दिनकर गंभीर जखमी झाले. याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.


















